गुळवेल २१ व्या शतकातील वरदान !

  1. प्रतिनिधि | पुणे |

गुळवेल
==========
दिव्य औषधी ‘गुळवेल’ ही आयुर्वेदातील महत्त्वाची वनस्पती आहे. गुळवेल या वनस्पतीस ‘अमृता’ हे नाव देखील आहे. कारण, ती अमृतासमान गुणकारी आहे. गुळवेल माणसाच्या अगणित व्याधींना दूर करून त्यास दीर्घायुषी करते.

गुळवेल ही अनेक वर्षे टिकणारी, एखाद्या झाडाच्या वा दुसर्‍या कोणत्याही आधाराला धरून वर चढणारी, नेहमी हिरवीगार राहणारी वेल आहे.
गुळवेल ही दिसायला मनीप्लांटसारखी परंतु, अतिशय दाट अशी विशाल वेल असते. पाने हृदयाच्या आकाराची असतात. यास पिवळी फुले येतात व लाल रंगाची छोटी छोटी गोल फळे झुबक्यांमध्ये लागतात. याचे कांड रसभरीत असते, ज्याचा औषधीकरिता उपयोग केला जातो.

गुळवेलीची अमृतासमान, रसायनी वा वयस्था (तारुण्याचे रक्षण करून म्हातारपण व रोगाचा नाश करणारी)
======
गुळवेल प्रतिकारशक्ती तंत्रास सशक्त करते :
शरीराचे प्रतिकार शक्ती तंत्र विकृत झाल्यास वारंवार सर्दीपडसे, ताप येणे, अशक्तपणा ही लक्षणे निर्माण होतात. गुळवेलच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. वारंवार आजारी पडणार्‍या व्यक्तींना गुळवेलामुळे फायदा होतो.
शरीरातील प्रतिकार शक्ती तंत्र विकृत झाल्यास अनेक व्याधी निर्माण होतात. विभिन्न एलर्जीजन्य आजार उदा. तसेच . गुळवेल त्रिदोष शामक आहे. गुळवेल रोगप्रतिकार तंत्रास सामान्य करते. अशा व्याधींवर गुळवेल अतिशय उपयोगीआहे, ===============
गुळवेल हे संधीवात व अन्य वात व्याधींवर उपयोगी आहे.
* गुळवेल शक्तिवर्धक व वीर्यवर्धक आहे.
* विभिन्न चर्मरोगावर प्रभावी आहे.
* मूळव्याध, महिलांचे प्रमेहादी विकारावर उपयोगीआहे
* मानसिक व्याधींवर उपयोगी.
* गुळवेल रक्तातील कोलेस्टेरॉल व रक्तशर्कराचे प्रमाण कमी करते.
===================
गुळवेल ही महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. तिचे खोड अनेक रोगांवरील औषधांत वापरतात.
गुळवेल कुटुपौष्टिक, पित्तसारक, संग्राहक, मूत्रजनन, ज्वरहर व नियतकालिक ज्वरनाशक गुणधर्माची आहे.
ही वनस्पती ताप, तहान, जळजळ, वांती यावर उपयुक्त आहे.
ती रक्तसुधारक असून, पित्तवृद्धीच्या म्हणजे काविळात गुणकारी आहे व त्वचारोगात उपयोगी आहे.
मधुमेह, वारंवार मूत्रवेग तसेच प्लिहावृद्धीत उपयुक्त आहे.
गुळवेल कुष्ठ व वातरक्त विकारातही उपयुक्त आहे.
गुळवेलीचे सत्त्व व काढा वापरतात. गुळवेलीचा पाण्यातील अर्क ज्वरनाशक म्हणून वापरतात. गुळवेलीचा काढा शक्तिवर्धक असून, दुर्बल करणारे रोग, खंडित ताप आणि अपचनात वापरतात. गुळवेल सत्त्व दीर्घकालीन आम्लअतिसारात वापरतात. आतड्यांचा प्रक्षोम आणि शक्ती क्षीण झालेली असताना तसेच संधिवाताची लक्षणे दूर करण्यासाठी ही औषधी वनस्पती महत्त्वाची मानली जाते.विशेष म्हणजे शरीरातील सर्वच पेशी वाढविण्यासाठी उपयोगी आहे
सौम्य विषमज्वरात आणि जीर्णज्वरात गुळवेलीचा चांगला उपयोग होतो.
गुळवेलीने भूक लागते, अन्नपचन चांगले होते, रोग्याचा फिक्कटपणा कमी होतो, अशक्तपणा कमी होऊन शक्ती वाढते.
===================
*सेवन विधी* :-
गुळवेलचे खोड औषधीकरिता उपयोगात आणतात. करंगळीएवढ्या जाडीचे एक फूट लांब कांड घेऊन त्यास कुटावे. त्यात ५-१० तुळशीची पाने घालावी व २ कप पाण्यात उकळावे. १/४ म्हणजेच १/२ कप होईपर्यंत आटवावे, नंतर गाळून १ चमचा मध घालून प्यावे. दिवसातून एक किंवा दोन वेळा घ्यावे.
बाजारामध्ये गुळवेल सत्व, अमृतारिष्ट इत्यादी नावाने गुळवेल उपलब्ध आहे, परंतु ताजी गुळवेल वनस्पती अधिक प्रभावी आहे.
मोसमी फ्लूसारख्या तापांकरिता ५-७ दिवस व अन्य व्याधींसाठी ३ आठवडे ते १/२ महिने किंवा अधिक काळाकरिता सेवन करावे ================
पचनाचे कार्य अधिक चांगले होते.
कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये ताप येऊन गेल्यानंतर गुळवेळीची भाजी खाणे फायद्याचे ठरते. कावीळ कमी होण्यास मदत होते.
*औषध उपयोगी भाग* – खोड व पाने
मात्रा – खोड व पाने 1-3 चमचे दिवसातून 3-4 वेळा घेऊन वर दूध साखर घ्यावे.
काढा – 4-8 चमचे दिवसातून 2-3 वेळा घेऊन वर पाणी प्यावे.
गुळवेल सत्त्व – पाव ते अर्धा चमचा दिवसातून 3-4 वेळा घेऊन वर दूध साखर घ्यावी.
===============
वृद्ध लोकांनी व हृदयविकाराच्या रुग्णांनी गुळवेल सत्त्व किंवा अमृतारिष्ट घ्यावे.
मुरलेल्या जुन्या तापामध्ये- गुळवेल सत्त्व फार गुणकारी ठरते.
यकृत विकार, कावीळ- गुळवेलसत्त्व अर्धा चमचा अधिक हळद अर्धा चमचा अधिक मध 1 चमचा दिवसातून 3-4 वेळा घेणे
मधुमेहात उपयुक्त – गुळवेलीमुळे मधूमेही रुग्णांची रक्तामधील वाढलेली साखर कमी होते. तसेच मधुमेहामध्ये होणारे मज्जादाह(न्यूरायटिस), अंधत्व (आॅप्टिक न्यूरायटिस) इत्यादी उपद्रव टळण्यास मदत होऊन प्रतिकारशक्ती वाढते.
शुक्रधातूवर्धक – पिल्यास आरोग्य चांगले राहून तारुण्याचे रक्षण होते.

*मानसिक ताणतणाव कमी होतो*- गुळवेलीमुळे मानसिक ताणतणाव कमी होतो. असे आता अधुनिक शास्त्रीय संशोधनाने सिद्ध झाले आहे. गुळवेलीचा परिणाम अ‍ॅड्रिनल या अंत:स्रावी ग्रंथीवर होऊन त्या ग्रंथीच्या अ‍ॅड्रिनॅक्लीज या अंत:स्रावावर नियंत्रण येते. या अंत:स्रावामुळे यकृतातून रक्त प्रवाहात जी शर्करा मिसळली जाते. गुळवेलीमुळे इन्शूलिन या अंत:स्रावाची शर्करेवर चांगली प्रक्रिया होऊन परिणामी रक्तामधील साखरेचे नियंत्रण राखले जाते. त्याचा मधुमेहीला चांगलाच उपयोग होतो.
================
रसायन कार्य – आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यामुळे गुळवेलीचे महत्त्व अनन्यसाधारण ठरते. म्हणूनच आपण प्रत्येकाने अगदी तुळशीप्रमाणेच गुळवेलही आपल्या परसात लावून दररोज गुलवेलीची ताजी 4-6 पाने चावून खावीत. ते शक्य नसल्यास गुळवेलसत्त्व खात्रीच्या जुन्या आयुर्वेदिक कंपनीचेच वापरावेत, कारण त्यात भेसळ असण्याची शक्यता असते. दररोजच्या गुळवेलीच्या सेवनाने आपले तारुण्यरक्षण होऊन म्हातारपण दूर राहीलच, पण व्याधीचाही प्रतिकार होऊन शरीर निरोगी, सतेज राहील यात शंका नाही.
==================
(गुळवेल) :-
गुळवेलचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म ती ज्वरनाशक, ज्वरध्न आहे. गुळवेल ही डेंग्यू, चिकन गुनिया, फ्लू, स्वाईन फ्लू इत्यादी विभिन्न व्हायरल इन्फेक्शन वर रामबाण औषधी आहे. मागील वर्षी दिल्लीमध्ये डेंग्यू तापाची साथ पसरली होती. तेथील द्वारका या वसाहतीतील उदाहरण उल्लेखनीय आहे. या वसाहतीतील शेकडो कुटुंबांमध्ये डेंग्यूचा प्रकोप झाला. डेंग्यूने फणफणणारा १०४ फॅ.पर्यंतचा ताप, संपूर्ण अंगात विशेषत: सांध्यात भयंकर वेदना होत्या. रक्ताची चाचणी केली असता डेंग्यू असल्याचा रिपोर्ट आला. त्याच वसाहतीमध्ये बाबा रामदेवांचे पतञ्जली योग केंद्र कार्यरत होते. त्यांच्या प्रमुखांनी सर्वांना गुळवेल घेण्याचे सुचविले. तसेही डेंग्यू किंवा तत्सम व्हायरल तापांसाठी आधुनिक वैद्यक शास्त्रात औषध नाही आणि समाधानाची बाब म्हणजे सर्वांना आराम मिळाला. अशा व्हायरल तापाने ग्रस्त अनेक रुग्णांचा केवळ गुळवेलमुळे आजार दूर झाल्याचा अनुभव आहे.
डेंग्यूसारख्या व्हायरल तापामध्ये रुग्णांच्या रक्तातील श्‍वेत रक्तपेशी प्लॅटिलेट्‌स चे प्रमाण अतिशय कमी होते. त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. अशा रुग्णांना प्लाझ्मा रक्तघटक दिल्या जातो. परंतु अशा रुग्णांना गुळवेल दिल्यास त्यांच्या श्‍वेत रक्तपेशीव प्लॅटिलेट्‌स लवकर सामान्य होतात.
===============
कॅन्सर व गुळवेल :-
कॅन्सरवर गुळवेलच्या संशोधनाचे परिणाम आशादायी आहेत. कर्करोगाच्या रुग्णास किमोथेरपी चिकित्सा सुरू असताना त्याचे दुष्परिणाम अतिशय कष्टदायक असतात. मळमळ, उलट्या, तोंडास फोडे येणे, भूक न लागणे, शरीराचा दाह होणे, अशक्तपणा इ. दुष्परिणाम भोगावे लागतात. मुंबईच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलने केलेल्या संशोधनाद्वारे हे तथ्य समोर आले आहे की, अशा रुग्णांना गुळवेल दिल्यास वरील दुष्परिणाम कमी होतात व रुग्ण लवकर बरा होतो.
*बाजारात मिळणारी गुळवेलीची औषधे* अमृतारिष्ट, गुडुच्यादी चूर्ण, गुडुच्यादी क्वाथ (काढा). गुडुची लोह गुडुची सत्त्व. गुडुची तेल – त्वचारोग व वेदना कमी करण्यासाठी बाहेरून लावावे.आणि सर्व आजारात उपयोगी म्हणजे गिलोय सत्व ,
*पाककृती*
गुळवेलीची भाजी
साहित्य – गुळवेलीची कोवळी पाने, चिरलेला कांदा व लसूण, तेल, तिखट. मीठ इ.
कृती – गुळवेलीची पाने स्वच्छ धुऊन, चिरून घ्यावीत. तेलात कांदा व लसूण लालसर होईपर्यंत भाजून घ्यावी. नंतर त्यामध्ये चिरलेली भाजी, तिखट, मीठ घालून चांगले परतून घ्यावे.
*आपल्या सर्वांच्या चांगल्याआरोग्यासाठी महत्वपुर्ण सादर* 🌹🌹🌹🙏🏻..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×