कोविडचा अजून एक घोळ! जेवणातही राजकीय हस्तक्षेप!
पिंपरी( प्रतिनिधी )
कोविड१९ ची साथ अनेकांसाठी पैसे कमावण्याची संधी झाली आहे. त्यात नगरसदस्य हात धुऊन घेत आहेत. जास्तीत जास्त १२६ रुपये खर्च होणारे निकृष्ठ दर्जाचे जेवण १८० रुपयात रुग्णांना पुरवण्यात येते. या सावित्री स्वयंरोजगार संस्थेला दिलेल्या ठेक्यात चिंचवड विधानसभेतील एक नगरसेविका असल्याने आमचा नाईलाज असल्याचे सांगून पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी काखा वर करीत आहेत.
सद्यस्थितीत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कोविड केअर सेन्टरमध्ये १६३३ रुग्ण दाखल आहेत. या सर्व रुग्णांना सावित्रि स्वयंरोजगार संस्थे मार्फतच जेवण, चहा नाश्ता दिला जातो. दोन वेळचे जेवण, दोन वेळचा चहा आणि सकाळचा नाश्ता जागेवर पोहोच करण्यासाठी १८० रुपये प्रती रुग्ण महापालिकेच्या वतीने अदा करण्यात येतात.
कोविड१९ ची साथ अनेकांसाठी पैसे कमावण्याची संधी झाली आहे. त्यात नगरसदस्य हात धुऊन घेत आहेत. जास्तीत जास्त १२६ रुपये खर्च होणारे निकृष्ठ दर्जाचे जेवण १८० रुपयात रुग्णांना पुरवण्यात येते. या सावित्री स्वयंरोजगार संस्थेला दिलेल्या ठेक्यात चिंचवड विधानसभेतील एक नगरसेविका असल्याने आमचा नाईलाज असल्याचे सांगून पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी काखा वर करीत आहेत.
त्यासाठी महापालिकेने ठरविलेले मानक तपासले असता दोन वेळचा भात ८रु.,दोन वेळच्या चपात्यांचे पीठ ११रु.,दोन वेळच्या डाळी व कडधान्ये ६ रु., काकडी टम्याटो कंदमुळे ५ रु., नाश्त्यासाठी पोहे सुजी रवा ४रु., सर्व पदार्थ बनविण्यासाठी तेल १५ रु., एक लिटर बाटलीबंद पाणी ३ बाटल्या २७ रु., पॅकिंग खर्च १५ रु., पोहोचविण्याचा खर्च १५ रु. आणि बनविण्याचा व वरकड खर्च २०रु. असे मिळून १२६ रु. खर्च होतात.
एव्हडी रक्कम खर्च करूनही रोज ४० टक्के अन् कचऱ्यात जाते. कित्येक वेळा संपूर्ण जेवण कचराकुंडीत टाकले जाते. अत्यंत निकृष्ठ दर्जाचे हे जेवण रुग्ण नाकारतात. सुमारे ३० टक्के रुग्ण घरून जेवण मागवतात. मात्र रोजमेळात पूर्ण जेवण, नाश्त्याची नोंद होते. रुग्णांना देण्यात येणारे जेवण सकस नसेल तर रुग्ण बरे कसे होणार, हा मुद्दा अजून अलाहिदाच आहे.
कोणतीही सकसता नसलेले जेवण केवळ सदर संस्था एका नागारसेविकेशी संबंधित आहे म्हणून प्रशासन मूग गिळून गप्प आहे. रोज ५४ रुपये प्रति रुग्ण असे १६३३ रुग्णांचे पैसे मिळूनही सदर संस्था काम परवडत नाही म्हणून ओरड करीत आहे. वर पुन्हा सामाजिक कार्य म्हणून हे काम आम्ही करीत असल्याचा आवही आणला जात आहे. या सर्व गोंधळात रुणांचे स्वास्थ्य मात्र वाऱ्यावर सोडून देण्यात आले असल्याची भावना रुग्णांमध्ये आहे.