आयुक्त राजेश पाटील यांचा टेक महिंद्रावर कारवाईचा बडगा! सायबर हल्ल्याचा खुलासा आज द्यावा लागणार!
पिंपरी ( दि. २३/०३ २०२१ )
टेक महिंद्रा कंपनीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातील संगणक प्रणालीवर झालेल्या हल्ल्याबाबत पोलिसात तक्रार केली आहे. मात्र पाच कोटी रुपयांचे नुकसान कसे झाले, याचा खुलासा केला नाही. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी टेक महिंद्रा आणि त्यांच्या भागीदार कंपन्यांना नोटीस बजावली असून त्याचा खुलासा आज सोमवार दि.२३/०३/२०२१ रोजी करणे कंपनीला बंधनकारक करण्यात आले आहे.
आयुक्तांनी कंपनीला दिलेल्या नोटिसमध्ये पाच कोटींचे नुकसान झाले म्हणजे नक्की काय याचे विवरण मागितले आहे. त्याच बरोबर सायबर हल्ल्यात किंवा इतर कोणत्याही कारणाने डाटा नष्ट होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली याची माहितीही मागितली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी विभागाचा एकंदर करभारच गोंधळाचा आणि आतबट्ट्याचा असल्याची चर्चा शहरभर आहे. या सायबर हल्ल्याच्या निमित्ताने आयुक्तांनी सम्पूर्ण स्मार्ट सिटी विभागाचीच तज्ज्ञांकडून चौकशी करावी अशी मागणीही होत आहे.