महापालिकेत एकच “लडकत”, बाकी सगळे नालायक, हलकट?

आता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे, किंबहुना एकूणच स्थापत्य विभागाकडे एकही लायक माणूस उरला नसावा. शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणि पाणी पुरवठा विभागाचे चालू प्रकल्प पूर्ण करण्यासाठी, अकरा आठवड्यांपूर्वी विहित वयोमानाने सेवानिवृत्त झालेल्या प्रभारी सहशहर अभियंता प्रवीण लडकत यांना, त्यामुळे सल्लागार पदी नियुक्ती देण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. एखादा माणूस सेवानिवृत्त झाल्यावर त्याच्या जागी काम करण्यास एकही लायक व्यक्ती महापालिकेत नसावी यासारखी नामुष्की नाही. स्थापत्य सहायकापासून शहर अभियंत्यांपर्यंत काहीशे अभियंते या महापालिकेत सांप्रतला कार्यरत आहेत. त्यातील एकही माणसाची लायकी सेवानिवृत्त प्रवीण लडकत यांचे काम करण्याच्या लायकीचा नाही, याचाच अर्थ असा की पिंपरी चिंचवड महापालिकेचा सगळाच्या सगळा अभियंता वर्ग नालायक आहे आणि तरीही ही महापालिका त्यांना पोसते आहे, याची त्यांना जराही लाज वाटत नाही म्हणून हलकट देखील आहे, हे स्पष्ट झाले आहे. 

या अधोरेखित पद्धतीने स्पष्ट झालेल्या बाबीमुळे कदाचित पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना प्रवीण लडकत यांच्याशिवाय कोणताही पर्याय उरला नसल्याने, लडकतांना सल्लागार पदी नेमण्याची गरज पडली असावी, असे प्रथमदर्शनी तरी वाटते. हे वाटणे खरे आहे किंवा कसे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, अनेक गंभीर तरीही गंमतीदार बाबी समोर आल्या. त्यातील ज्यांवर चर्चा करणे शक्य आहे, अशा काही बाबींचा उलगडा करण्याचा हा प्रयत्न आहे. अर्थात या सर्व उलगड्यातील बाबी प्रवीण लडकत यांना सल्लागारपदी का नेमले असावे, या एकाच बाबीवर अवलंबून आहेत. यासाठी सर्वप्रथम महापालिकेच्या सेवेत कनिष्ठ अभियंता म्हणून सुरुवात केलेल्या आणि प्रभारी सहशहर अभियंता पदापर्यंत पोहोचलेल्या प्रवीण लडकत यांच्याविषयी.

लडकत म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी.

मुळात पाणीपुरवठा विभागात काम करण्यास कोणताही अभियंता फारसा उत्सुक नसतो, हे स्वयंस्पष्ट सत्य आहे. करण या विभागात काम खूप मात्र, केलेल्या कामाची दखल घेतली जात नाही, शिवाय पाणीपुरवठ्याबाबत सर्वांना कधीच सर्ववेळ समाधानी करता येत नाही, असा या विभागाचा लौकिक आहे. त्यामुळे या विभागात काम करण्यास तयार असलेल्या अभियंत्याला विभाग सोडण्यास कधीच सांगितले जात नाही. तशातच प्रवीण लडकत यांनी कनिष्ठ अभियंत्यापासून प्रभारी सहशहर अभियंता पडपर्यंतच्या सेवाकाळात सगळ्यात जास्त वेळ पाणीपुरवठा विभागात काम केले आहे. मात्र, हे खरे असले तरी, आपल्या पाणीपुरवठा विभागाच्या सेवाकाळात अगदी सेवानिवृत्त होईपर्यंत लडकतांनी त्यांच्या अखत्यारीतील एकही कंविहित वेळेत पूर्ण केल्याचे उदाहरण जवळपास नाहीच.

अगदी गेल्या पाच वर्षांच्याया कालावधीचा विचार केला तरी, लडकत ठेकेदारांना मुदतवाढ देण्यात विशेष प्रविण असल्याचे निदर्शनास येते. ते भ्रष्टाचारी नाहीत, असे तेच कंठारवाने सांगत असले तरी, त्यांनी वेळेत काम करून घेतलेला ठेकेदार एखाददुसराच सापडू शकेल, हेही सत्य लपून राहिलेले नाही. त्याचबरोबर एखाद्या निविदेत ठरल्यापेक्षा झाडाचे काम करून घेण्यात आणि त्याचा लाभ ठेकेदाराला मिळवून देण्यातही त्यांचे खास प्राविण्य आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास दररोज चोवीस तास पाणी पुरवठा करण्याची निविदेत वेळ संपूनही वेळ संपूनही रखडलेली महापालिकेची महत्त्वाकांक्षी २४×७ पाणीपुरवठा योजना, विहित वेळेपेक्षा जास्त वर्ष उलटून गेले तरी आजही टेक महिंद्रा कंपनीकडून स्काडा प्रणालीचे न मिळालेले कंट्रोल पॅनल, चिखलीच्या जलशुद्धीकरण केंद्राचे थांबलेले काम, याच केंद्राचे लक्षात न राहिलेले आणि आता निविदा प्रक्रिया सुरू झालेले विद्युतीकरण, कायम दर्जा सुधारण्यासाठी आसुसलेली स्काडा प्रणाली या सहज लक्षात येणाऱ्या बाबी आहेत.

मग गेल्या अकरा महिन्यात असे काय झाले,की लडकत यांनाच परत सल्लागारपदी घेण्याची गरज आयुक्तांना वाटलं8 असावी, हे पाहणे महत्वाचे आहे. आतापर्यंतच्या सेवाकाळात प्रवीण लडकत यांनी केवळ सादरीकरणाच्या प्राविण्यावर दिवस काढले आहेत. सल्लागारांनीं तयार केलेले संगणकीय सादरीकरण दाखवून त्यांनी आपल्या अकलेचे तारे तोडल्याची चर्चा महापालिकेतील अभियंता वर्गात आहे. याचबरोबर आपल्या अखत्यारीतील कामांची तांत्रिक  माहिती इतर कोणाला समजून सांगण्याची तसदी त्यांनी कधीच घेतली नाही. किंबहुना, आपल्या कामात कोणाचीही ढवळाढवळ नको हा त्यांचा कायमचा प्रघात होता. त्यामुळे उत्तराधिकारी अगर सर्व माहिती असलेला सहकारी लडकतांनी कधी निर्माणच होऊ दिला नाही. म्हणून मग त्यांच्या जागेवर तेच हवेत, अशी अपरिहार्यता त्यांनीच निर्माण करून ठेवली आहे.

अशा अधिकाऱ्याला उलट कार्यप्रणालीपासून दूर ठेवणे गरजेचे असते. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सल्लागारपदाचा अतिरिक्त लाभ आणि कार्यप्रणालीत आपली अपरिहार्य ढवळाढवळ करण्याची संधी सेवानिवृत्त प्रभारी सहशहर अभियंता प्रवीण लडकत यांना का दिली असावी, हे अनाकलनीय आहे. की खरोखरच महापालिकेतील  अभियंते नालायक आणि हलकट आहेत आणि याचा साक्षात्कार आयुक्तांना झाला आहे अगर तसा करून देण्यात आला आहे?

–—————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×