मावळात पार्थ पवारांच्या पराभवाचा बदला घेतला जाणार?

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

राजकारणात वार, प्रतीवार, वचपे, उट्टे, बदला ही नेहमीची बाब आहे. किंबहुना, हाच आजच्या राजकारणाचा खरा खेळ असल्याचे दृश्य आहे. निवडणुका तर या वार, प्रतिवार, वचपे, उट्टे, बदले यासाठीच असतात काय असे सध्याचे वातावरण आहे. वारावर प्रतिवार करणार नाही, वचप्याचे लचके तोडणार नाही, उट्टे उणे करणार नाही आणि बदला घेणार नाही असा राजकारणी सापडणे जवळपास अशक्यच. या पार्श्वभूमीवरच सध्या मावळ लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण राजकारण अवलंबून राहिले आहे. या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पूर्णतः बदल्याच्या राजकारणाचा खेळ झाली असल्याचे उघड गुपित चर्चिले जात आहे. आपल्या पुत्राच्या पराभवाचा बदला अजितदादा पवार घेतात किंवा कसे यावर मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात दबक्या आवाजात सर्वत्र चर्चा होत आहे. का होते आहे ही चर्चा अशा दबक्या आवाजात याचा धांडोळा घ्यायचा अस्मादिकांनी प्रयत्न केला. या प्रयत्नात अस्मादिकांना अनेक गंभीर तरीही गंमतीशीर बाबींचा उलगडा झाला. या बाबी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न म्हणून हे लेखन! 

आता या चर्चेची चर्चा सुरुवातुपासून करू, म्हणजे त्यातील गांभीर्य आणि गंमत लक्षात येईल. २००८ साली लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचे विभाजन करून पिंपरी चिंचवड शहरात तीन विधानसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आले त्यापैकी चिंचवड आणि पिंपरी या शहरातील दोन आणि मावळ या पुणे जिल्ह्यातील विधानसभा  मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण हे विधानसभा मतदारसंघ जोडूनमावल लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला. २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आझम पानसरे यांच्या विरोधात शिवसेना भाजप युतीचे गजानन बाबर निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी अजितदादा पवार यांचे खांदे समर्थक असलेल्या लोकांनी अजितदादांच्या साक्षीनेच आझम पानसरे यांना पडून गजानन बाबर यांना निवडून आणले. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस मधून त्यांच्याकडे आलेल्या श्रीरंगअप्पा बारणे यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्याचे भाजप मध्ये असलेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना उमेदवारी दिली. मात्र, एकेकाळचे अजितदादांचे निष्ठावान असलेले लक्ष्मण जगताप यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवली. या तिहेरी लढतीत श्रीरंगअप्पा बारणे यांचा विजय झाला.

खरी नाट्यमयता आली ती २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत. राष्ट्रवादी काँग्रेसने अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आणि शिवसेनेच्या उमेदवरीवर श्रीरंगअप्पा बारणे दुसऱ्यांदा मावळच्या मैदानात होते. सुमारे दोन लाख सोळा हजार  मतांनी पार्थ पवारांना बारणे यांनी आस्मान दाखवले. या निवडणुकीनंतर सुमारे वर्षभर अजितदादांनी पिंपरी चिंचवड शहराकडे अक्षरशः तिरस्कारी दुर्लक्ष केले. त्यानंतरही बराच काळ आपल्या सुपुत्राच्या पराभवाचा सल अजित पवार खाजगीत व्यक्त करीत असत. अजितदादांच्या या सलामुळेच बारणे यांना सध्याच्या म्हणजेच २०२४ च्या निवडणुकीत उमेदवारी मिळू नये म्हणून अनेक प्रयत्न केले. त्यासाठी भाजपच्या काही लोकांना देखील हवा भरली. तरीही आता शिंदे शिवसेनेच्या उमेदवरीवर श्रीरंगअप्पा बारणे तिसऱ्यांदा मावळच्या मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात एकेकाळचे अजित पवारांचे खंदे समर्थक आणि सध्याचे उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील मशाल चिन्हावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. 

आता प्रश्न उरतो तो हा की, अजितदादा आपल्या पुत्राचा पराभव विसरले आहेत काय? तर, सर्वसामान्य लोकांना असे वाटते की, अजितदादा कोणतीही गोष्ट विसरत नाही, पराभवाचा सल तर नाहीच नाही. मग अजितदादांची मानसिकता श्रीरंगअप्पा बारणे यांना मदत करण्याची असू शकते काय, यावर स्वतः बारणेंसह भाजपने देखील विचार करणे गरजेचे आहे. अजितदादा आणि त्यांचे समर्थक बारणे यांच्या प्रचारात किती मनापासून सहभागी होतील हे आता येत्या तेरा तारखेला होणारी निवडणूक आणि ४ जून रोजी लागणारा निकालच यावर प्रकाश पडू शकेल. मात्र, काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे रोहित पवार मी माझ्या भावाचा पराभव विसरलो नाही, हे स्पष्ट करून गेले आहेत, हेही तितकेच खरे.

—————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×