“नवनायक!” आम्ही पण आहोत!

“नवनायक” म्हणजे नायक नव्या युगाचा!

हे नवे युग आहे, तांत्रिक माध्यमांचे!या नव्या युगाचे नायक व्हायचे स्वप्न प्रत्येकाचे आहे.या नव्या माध्यमांचा वापर करून नव्या युगाचे, नव्या जगाचे आसमान व्यापण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करीत असतो. काहींना हे जमते, काहींना नाही. मग ज्यांना जमत नाही त्यांनी काय करावे?

आम्ही अश्याच जनसामान्यांसाठी हे नवे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत. काय उपयोग करता येईल या सामान्यांना या माध्यमाचा? या समान्यांना त्यांचं म्हणणं, त्यांचं कर्तृत्व, त्यांचे विचार, त्यांचे अधिकार, त्यांचे हक्क, त्यांची मानांकने यावर बोलण्याची यांना अबाधित राखण्याची हुकमी जागा ही माध्यमे त्यांना उपलब्ध करून देऊ शकतात.

म्हणून मग आम्ही आमची बांधिलकी माणून “नवनायक” हे ई माध्यम उपलब्ध करून देत आहोत. सामान्यांतील असामान्यत्व जपण्याचा आणि ते वाढविण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

त्यासाठी आपली साथ आवश्यक आहे.

धन्यवाद!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×