आम्ही, भारताचे लोक आणि आमचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य!

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा या त्याच्या सर्व नागरिकांस;
समाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मकता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.


भारताचे संविधान, आम्ही भारतीयांनी अंगीकृत आणि अधिनियमित करून अर्थात स्वीकारून आज २६ जानेवारी, २०२२ रोजी संपूर्ण बाहत्तर वर्षे झाली. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणाराज्याचा राष्ट्रध्वज फडकावून आपण न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व समस्त देशवासियांना प्रदान करण्याची ग्वाही दिली. या संपूर्ण कालावधीत खरोखरच आपण ती ग्वाही देण्याचे आपले अभिवचन पूर्ण केले आहे काय, यावर स्वविनिमय करणे गरजेचे झाले आहे. आपण आपले संविधान स्वतःप्रत अर्पण करताना दिलेले हे अभिवचन आज वाचताना अगर त्याचे स्मरण करताना, आपण ते पूर्ण करू शकलो आहोत काय, हे तपासून पाहिले पाहिजे. किंबहुना, आम्ही, भारताचे लोक, आपले लोकशाही गणराज्य तरी अबाधित राखू शकलो आहोत काय, याची तपासणी होणे आवश्यक झाले आहे. गेल्या बाहत्तर वर्षात तसे पाहिले तर, आपली लोकशाही समृद्ध आणि सफल, सुफळ व्हायला हवी होती. तशी ती आहे हे, आजमितीस म्हणता येईल काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×